Contour marker

कंटूर मार्कर -
१)२.५ मिमि अचुकता २) लगेच गवत वाढते आणि ते खरं काम करते ३)नैसर्गिक सक्सेशनला अनेक पटीने अॅक्सिलरेट करायचं आहे ४) कंटूर इंटरव्हल कमी ठेवायचे असते ५) उगाच खणत बसायचे नाही जिथं शक्य तिथं बैलांच्या सहाय्याने बळीराम नांगराने काम होते मात्र किमान एक बैल हाती धरून चालवावे लागतात .६) ओहोळाच्या ठिकाणी जवळजवळ पाॅईंटस् घ्यायचे जास्त अॅक्युरसी लागते ७) पाॅईंटस घेण्यास सुरवातीस फार वेळ लागतोय म्हणून कंटाळा येतो कटकट करतात पण खणण्यापेक्षा कितीतरी कमी कष्ट पडतात त्यामुळे आखणारे /खणणारे अशा वर्णव्यवस्था शक्यतो नकोत ८) एक दोन दिवसांच्या सरावानंतर कामांची वेग अनेक पटीने वाढतोच ९) आखणाऱ्याच्या कामात ढिलाई नको

रुद्रगंगा - कंटूर मार्कर

गवंडी लोक बांधकाम करतांना लेवल तपासण्यासाठी पाणी भरलेल्या नळीचा वापर करतात . क्रुषि अभियांत्रिकी चे प्राध्यापक
श्री भागवतराव धोंडे यांनी
यावरून कंटूर मार्कर हे साधन निर्माण केले .या साधनाचे सहाय्याने एक मिमि एवढ्या अचूकतेने जमीन पातळी मोजता येते .
पाण्याने वेग पकडला की ते
1) जमिनीत जिरत नाही .2)माती वाहून नेते .
कंटूर मार्कर हे अत्यंत अचूक उपकरण असल्याने ,
त्याचे सहाय्याने कंटूर म्हणजे समपातळी रेषा आखून त्यावर साधा दगडांचा अडथळा जरी निर्माण केला तरी त्यामुळे
पाण्याला वेग पकडता येत
नाही . अचूकता नसेल तर
मोठे चर , बांध यांची गरज।
भासेल . धोंडे सर गंमतीने
म्हणत की माणसे समपातळी रेषेवर बहिर्विधीला जरी बसली तरी तेवढ्या अडथळ्यामुळे
जल आणि भूसंधारणाचे काम होईल .
रुद्रगंगेमध्ये जेथून पाणी येते , त्या सर्व क्षेत्रावर कंटूर
मार्करचे सहाय्याने अचूक
समपातळी रेषा आखून घेतल्या आणी या रेषांना धरून , माती असेल तेथे फक्त सहा ईंच खोल चर खणून , त्या मातीचे समपातळी बांध घातले तर
या सर्व क्षेत्रावरील माती जागचे जागी राहील . पाणी
जमिनीत मुरेल , जलधर संप्रुक्त झाल्यावर निर्मळ गाळविरहित पाणी लहान
मोठ्या प्रवाहांत उतरेल .
200 सेंमी पावसाला सुद्धा
या पद्धतीने तोंड देता येते हे
वनाधिकारी कै वसंतराव
टाकळकर यांनी सिद्ध करून दाखविले आहे .
या कामासाठी शेकडो कंटूर मार्कर आणि माणसे
लागतील . खणण्याची क्षमता नसणारे समपातळी रेषा आखत जातील आणि
ज्यांना खणता येते ते उथळ
चर खणत जातील . माथ्या
पासून ( सर्व रुद्रगंगा क्याचमेंट मध्ये ) सुरुवात केली आणि दर वर्षी थोडे
थोडे काम करीत गेले तर
या खो-यामधील कोणताही
तलाव गाळाने भरणार नाही .नदीला मोठे पूर येणार नाहीत . नदीत गढूळ
पाणी येणार नाही . हे काम
रुद्रगंगा खो-यामधील सर्व
गावांचे आहे . जर असे घडले तर असा आदर्श घालून देणारे आपण जगातील पहिले असू .
Sent from my iPhone

0 comments: